'मला सीएम करा, सारथीचा प्रश्न चुटकीत सोडवतो';- संभाजीराजे छत्रपती

'मला सीएम करा, सारथीचा प्रश्न चुटकीत सोडवतो';- संभाजीराजे छत्रपती

सरसकट फेलोशिप मिळावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर संशोधक विध्यार्थी गेल्या 14 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

सरसकट फेलोशिप मिळावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर संशोधक विध्यार्थी गेल्या 14 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांनी या विद्यार्थ्यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली.

यावेळी विध्यार्थ्यांनी हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता, आम्हाला न्याय मिळवून द्या अशी साद घातली, ऐन दिवाळीत उपोषण करू नका असा सल्ला संभाजीराजेंनी विध्यार्थ्यांना दिला. मात्र विद्यार्थ्यांनी आम्हाला निर्णय द्या, आम्ही उपोषण मागे घेतो असा पवित्रा घेतला. यावेळी मला मुख्यमंत्री करा, सारथीचा प्रश्न चुटकीत सोडवतो अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी व्यक्त केल्यानंतर संशोधक विद्यार्थीही बुचकळ्यात पडले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com