नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच क्षीरसागर काका पुतण्याची लढाई भाऊबंधकीवर

नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच क्षीरसागर काका पुतण्याची लढाई भाऊबंधकीवर

Nagar Panchayat Election : सख्ख्या चुलत भावंडांची प्रतिष्ठा पणाला

विकास माने | बीड : क्षीरसागर काका-पुतण्याचे राजकीय वाद सर्वश्रुत आहे. नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच काका-पुतण्याची लढाई आता भाऊबंधकीवर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) आणि शिवसेना नेते योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) या सख्ख्या चुलत भावंडांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघा भावंडांत आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याने या निवडणुकीचे महत्व वाढले आहे.

नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच क्षीरसागर काका पुतण्याची लढाई भाऊबंधकीवर
'ओबीसींविरोधात निकाल लागला तर शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या गाड्या फोडू'

बीड जिल्हा आणि राजकारण समीकरण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणजे नगर परिषदेची. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. एरवी काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मात्र, आता नगर परिषदेच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच सख्खे चुलत भावंड आमने-सामने पाहायला मिळणार आहेत.

आचारसंहिता लागू होतात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची जुळवा-जुळव करत पहिली बैठक राष्ट्रवादी भवन येथे घेतली. दरम्यान, आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकासह चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली आहे. शहराच्या विकास कामात मी अग्रेसर असून काकांनी काहीच केलं नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या 52 जागावर देखील राष्ट्रवादीचाच विजय होईल असा विश्वास या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय.

नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच क्षीरसागर काका पुतण्याची लढाई भाऊबंधकीवर
Chandrashekhar bawankule : ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत टाईमपास केला

तर दुसरीकडे शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी देखील बैठकीचा सपाटा सुरू केला. बीड शहराला बकाल करण्याचं काम आमदार संदीप क्षीरसागरांनी केलं. त्यांनी कुठल विकास काम कधी केले ते समोर येऊन सांगावं, असं आव्हानच योगेश क्षीरसागर यांनी चुलत बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांना दिले आहे. एकदाच होऊनच जाऊ द्या, असं सूचक वक्तव्य शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.

ऑगस्ट महिन्यात नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर क्षीरसागर भावंडात पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळून आला आहे. विकास कामाच्या श्रेयावरून दोन्हीही भावंडात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एरवी काका विरुद्ध पुतण्या झालेल्या राजकीय लढतीत यंदा पहिल्यांदाच दोन्ही सख्खी चुलत भावंड आमने-सामने आले आहेत. त्यामुळे बीडच्या राजकारणात एक नवीन पर्व पाहावयास मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com