जळगावमध्ये 50 खोक्यांची गुलाबो गँग; राऊतांचा गुलाबराव पाटालांवर हल्लाबोल

जळगावमध्ये 50 खोक्यांची गुलाबो गँग; राऊतांचा गुलाबराव पाटालांवर हल्लाबोल

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना डिवचले आहे.

जळगाव : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना डिवचले आहे. गुलाबराव पाटील यांची गुलाबो गँग असल्याचं सांगतानाच आज पाटील यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांनी कसा भ्रष्टाचार केला याची माहितीच संजय राऊत यांनी दिली. लोकांचे प्राण जात असताना गुलाबो गँग भ्रष्टाचार करत होती, अशी टीका त्यांनी केली आहे.

जळगावमध्ये 50 खोक्यांची गुलाबो गँग; राऊतांचा गुलाबराव पाटालांवर हल्लाबोल
जळगावात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; सभेआधीच वातावरण गरम

जळगावमध्ये एक गुलाबो गँग आहे. ज्यांनी 50 कोटी घेतले व विकले गेले. सुवर्ण नगरी आहे ते काही दिवस आमच्यात सोन म्हणून वावरत होते मात्र ते कोळसा निघाले. आजच्या सभेत त्यांचा भांडाफोड करू. हे कागद या पालकमंत्र्यांच्या भांडाफोड करणारे आहेत. कोरोनात अनेक साहित्य चढया भावाने खरेदी केले आहे. दोन लाखांची वस्तू 15 लाखांला विकत घेतली. त्यांच्याच गँगच्या एका आमदाराने यावर प्रश्न उपस्थित केले. हे सगळ प्रकरण आता बाहेर काढू, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

तर, गुलाबराव पाटलांनी सभा उधळण्याचा इशारा ठाकरे गटाला दिला होता. यावर संजय राऊत म्हणाले की, मारा दगड आता लोक तुम्हाला मारतील. दादा भुसे, राहुल कुल यांचे भ्रष्टाचाराचे कागद सीबीआयकडे दिले आहेत. देवेंद्र फणवीस यांना आव्हान आहे त्यांनी चौकशी करून दाखवावी. किरीट सोमया यांच्यात हिंमत असेल तर यांनी त्यावर बोलावं. लोकांचे प्राण जात असताना गुलाबो गँग भ्रष्टाचार करत होती.

राहुल कुल मनी लॉंड्रिंग बाबत अनेक पुरावे दिले. कारवाई कधी करणार, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, गुलाबराव पाटलांनी आधी राजीनामा द्यावा कारण शिवसेनेने त्यांना निवडून दिले आहे. आधी तुम्ही राजीनामा द्या मग आम्ही बघू. हे गद्दार गेले जिथे जातील तिथे शिवसेनेचे नेते निवडून येतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हंटले होते. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वाटत असेल तर विखे पाटलांनी मंगळसूत्र घालावं.विखेंनी अनेकांना वेड्यात काढल आहे अनेक पक्षात गेले आहे. ते परत सत्ता बदलली तर ते परत तिकडे जातील, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com