डॉ. मिंधेंनी सावरकरांचे विचार वाचलेत का? राऊतांचा सवाल

डॉ. मिंधेंनी सावरकरांचे विचार वाचलेत का? राऊतांचा सवाल

शिंदे गट व भाजपची आज सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे गट व भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : भाजप-शिवसेना वीर सावरकरांची विचार यात्रा काढत आहे. परंतु, तुम्ही सावरकरांचे विचार वाचलेत का? मिंधे गट व भाजपला सावकर विचारांचे पारायण करण्याची गरज आहे. उगाच काहीतरी आम्ही सावकरवादी. तुम्ही सावकरवादी असूच शकत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिंदे गट व भाजपची आज सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे गट व भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

डॉ. मिंधेंनी सावरकरांचे विचार वाचलेत का? राऊतांचा सवाल
'धर्मराजा सांग, अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी कोणी गुंतवले?'

सावरकरांनी या देशाला दिशा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन दिलेला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन जर भाजप आणि मिंधे गट पाळणार असेल तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामीचा एक महत्वाचा संदर्भ दिला. भाजप म्हणते गाय ही गोमाता आहे. पण, सावरकरांना ते मान्य नव्हते. गाय हा उपयुक्त पशू आहे. जर गाय ही दुध देण्याची थांबली तर मग त्या गायीचे गोमांस खायला हरकत नाही हा सावरकरांचा विचार होता. हे भाजपला मान्य आहे का, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

सावरकरांनी शेंडी-जाणव्यांचे हिंदुत्व जे बाळासाहेबांनीही स्वीकारले नाही. सावरकरांना दाढी वाढवलेली आवडतं नव्हते. मग शिंदे दाढी काढणार आहेत का? सावरकरांनी सांगितले होते की दाढी वाढविणे आपल्या धर्मात बसत नाही. व्यवस्थित सुटसुटीत राहायच. मग, सावरकरांच्या यात्रेमध्ये एकनाथ शिंदे व मिंधे लोक ते गुळगुळीत दाढी करुन फिरणार आहेत का, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

सावरकरांची विचार यात्रा काढत आहे. तुम्ही सावरकरांचे विचार वाचलेत का? आधी मिंधे गटाने सावकरांचे साहित्यांचे पारायण करावे. मग त्यानंतर सावकर यात्रा काढावी. भाजपला सुध्दा सावकर विचारांचे पारायण करण्याची गरज आहे. उगाच काहीतरी आम्ही सावकरवादी. तुम्ही सावकरवादी असूच शकत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची संयुक्त सभा आहे. उध्दव ठाकरे उपस्थित राहतील. प्रमुख नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे व मराठवाड्यातील सर्व उपनेते, जिल्हाप्रमुख उपस्थित आहेत. लोक प्रमुख नेत्यांचे भाषण ऐकतील. प्रचंद गर्दी होईल, असे चित्र आहे. सभा शांतेतत पार पडेल आणि सभेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com