राजकारण
संजय राऊतांची फडणवीसांवर खरमरीत टीका
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय उलथापलथीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहे.
तुम्ही वापरलेली कुटनीती आम्हाला जमत नाही का, तुम्ही चाणक्याच्या पोटातून जन्म घेतला आहे का? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, 'उद्धवजी खोटे बोलले असा आरोप करणे हा पोहरादेवीचा अपमान आहे.
'महाविकास आघाडी स्थापन केली ही सुद्धा कुटनीतीच होती. कालपर्यंत नाही नाही नाही कोणतीही राष्ट्रवादीसोबत युती नाही, आपला धर्म अमुक धर्म नाही, तमुक कर्म नाही आणि आता म्हणे भावनिक युती होणार, अशी टीका राऊतांनी केली.