शिंदेच्या गौप्यस्फोटानंतर आता राऊतांचा मोठा गोप्यस्फोट; काय म्हणाले संजय राऊत...

शिंदेच्या गौप्यस्फोटानंतर आता राऊतांचा मोठा गोप्यस्फोट; काय म्हणाले संजय राऊत...

ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.
Published by :
Dhanshree Shintre

मोदींचं जनतेकडे लक्ष नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाची भीती आहे. मोदींचं वक्तव्य निवडणूक आयोगाला दिसत नाही का? कुणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा असतो का? केजरीवालांनी जेलमध्ये हत्या करायचं ठरवलं आहे का? केजरीवालांबद्दल माणूसकी दाखवा. सध्याचा निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे. दिल्लीमधलं निर्वाचन आयोग आहे त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 'जय भवानी' हा शब्द किंवा 'हर हर महादेव' या घोषणा पिढ्यान् पिढ्या दिल्या जात आहेत त्याच्यावर आतापर्यंत कोणी बंदी आणली नव्हती. काँग्रेसच्या राज्यात बंदी नव्हती. काँग्रेसच्या राज्यात सुद्धा 'जय शिवाजी जय भवानी', 'हर हर महादेव' याला बंदी नाही, 'घर घर मोदी' चालतंय तुमचं. पण हर हर महादेव चालत नाही जय भवानी चालत नाही. तुमचं नमो नमो ढमो ते चालतंय. पण हे चालत नाही. हा हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही कसला तुमचा सरकार बकवास हिंदूत्ववादी सरकार.

ते तुमचे फडणवीस म्हणतात आम्हाला, की तुम्हाला हिंदूत्वाचा नाव घ्यायचा अधिकार नाही. तुम्हाला आहे का? तुम्ही काय दिवे लावले हिंदूत्वाचे. शिवसेनेचा हिंदूत्वाशी संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत नाही. तुमचं व्यापारी हिंदूत्व आहे, तुमचं नकली हिंदूत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जय भवानी ही कुलदैवत आहे महाराष्ट्राची. त्याच्यावर तुमची निवडणूक आयोग बंदी आणतायेत आणि तुम्ही हात चोळत बसले आहात.

त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना? स्वःत एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरुन पळाले ना आणि ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं. त्यांनी समोरुन सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून. ते काय सांगतात खोटे बोलतायेत. भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटे बोलणाऱ्यांना स्थान आहे किंवा एखादा मुल भारतीय जनता पक्षात गेला कि त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं. तुम्ही कसे खोटं बोललं पाहिजे किंवा तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे. त्यानुसार एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलतायेत पण आज तुमची जेलवारी टळली असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com