Sanjay Raut : कमलेश सुतार, लोकशाही मराठीला टार्गेट केलंय

Sanjay Raut : कमलेश सुतार, लोकशाही मराठीला टार्गेट केलंय

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, सरकार चोर सोडून संन्याशाला फाशी देत आहे. कमलेश सुतार यांनी सत्य समोर आणलं. त्याची चौकशी करायची सोडून कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केला. हे एक प्रकारचे टार्गेट केलंय. सत्य समोर आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जातोय. असे राऊत म्हणाले.

तसेच राऊत यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कोणतीही सखोल चौकशी न करता लोकशाही चॅनल व संपादक कमलेश सुतार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे धक्कादायक आहे. सुतार यांनी एका भंपकआणि महाराष्ट्र द्वेषाची गरळ सतत ओकणारया व्यक्तीचा खरा चेहरा उघड केला.पण चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे.नागरी स्वातंत्र्याची चाड असणाऱ्या प्रत्येकाने आता या वर आवाज उठवायला हवा.पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर देखील याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून.. मी या दडपशाहीचा धिक्कार करतो.याचा जाब 2024 ला द्यावाच लागेल! असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com