Sanjay Raut : हे सरकार थाटामाटातच मरणार, अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार

Sanjay Raut : हे सरकार थाटामाटातच मरणार, अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार

मराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने उद्या औरंगाबाद येथे कॅबिनेटची बैठक होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

उद्या मराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, हे सरकार उद्या मराठवाड्यात येत आहे. त्यानिमित्ताने अव्वाच्या सव्वा खर्च केला जात आहे. कलेक्टरने सर्व हॉटेल बुक केली आहेत. कोण खर्च करतंय हे? या सर्वांचा विचार केला पाहिजे. या बेकायदेशीर सरकारचा निर्णय कोर्टात टिकणार नाही. प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना या खर्चाचा जाब द्यावा लागेल.

तसेच आमचं लक्ष बैठकीकडे आहे. बैठकीनंतरच्या पोपटपंचीकडे जास्त आहे. इथे दुष्काळ आहे. प्यायला पाणी नाहीये. अनेक प्रश्न आहेत. त्यावर हा संपूर्ण खर्च करा. उगाच वायफळ खर्च कशाला करता? हे सरकार थाटामाटातच मरणार आहे. या सरकारचे अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार आहोत. असे राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com