राजकारण
नीलम गोऱ्हे यांच्या सोडचिठ्ठीनंतर संजय राऊत म्हणाले, मला त्यांची लाज…
पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परीषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हेंनी प्रवेश केला आहे. निलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रेवेशावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, ज्या विचारसरणीतून त्या आल्या तरीही त्यांना जे जे हवं ते दिलं. . विधान परिषदेचं उपसभापतीपद दिलं. एवढं दिल्यानंतरही एखादी व्यक्ती पक्ष सोडून जात असेल, कारणं काही असेल… विकास असेल, अन्याय असेल. तर मला त्यांची लाज वाटते. महाराष्ट्रालाही त्यांना लाज वाटते. असे राऊत म्हणाले.