Sanjay Raut : एक देश, एक निवडणूक हा हवेत सोडलेला नवा फुगा
एक देश एक निवडणुकासाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. 2016 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात एक देश एक निवडणुकांसदर्भात उल्लेख केला होता. एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, देश एकच, एक देश एक निवडणुकीची गरज काय? एक देश, एक निवडणूकपूर्वी पारदर्शक निवडणूक घ्या. इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदींच्या सरकारने हा नवा फुगा हवेत सोडला आहे. दबावाखाली काम करणारे इलेक्शन कमिशन जोपर्यंत आहे. तोपर्यंत या देशामध्ये फेअर इलेक्शन होणार नाही. इंडिया आघाडीला ते घाबरलेले आहेत. असं राऊत म्हणाले॥