2024 ला ‘जायेगा तो मोदी’ याच घोषणा - संजय राऊत
लोकसभा निवडणूकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, यासोबतच ते म्हणाले की, भाजपकडे 2024 च्या निवडणुकीसाठी कुठलाही अजेंडा नाही. इंडियाला कुणीही काऊंटर करु शकत नाही. 2024ला आएगा तो मोदी नही तर जाएगा तो मोदी अशी घोषणा. असं संजय राऊत म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरता राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल, अशी भिती आम्हा सर्वांच्या मनात आहे. असे संजय राऊत म्हणाले.