Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

Sanjay Raut : 302 च्या कैद्यालाही मतदानाचा हक्क, मग मलिक अन् अनिल देशमुखांना का नाही?

संजय राऊत यांचा सवाल

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर, नवाब मलिक (Nawab Malik) व अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतदानाचा हक्क डावलला जात आहे. 302 च्या कैद्याला मतदानाचा हक्क असतो. मग, नवाब मलिक आणि अनिल देशमुख का नाही, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे.

Sanjay Raut
राज्यसभा निवडणुकीतून धडा? विधान परिषदेकरिता शिवसेनेची विशेष योजना

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेला आज 56 वर्ष झाली. शिवसेना हे एक वादळ आहे. कुंचला, लेखणी आणि वाणी यावर बाळासाहेब ठाकरे यांनी प्रादेशिक पक्षाची मूर्त रोवली. भूमिपुत्रांची भूमिका सर्व ठिकाणी प्रादेशिक पक्ष उभा आहे. दिल्लीच्या तख्तापर्यंत सेना आहे. अब तक 56 आणि पुढे देखील जातील. वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसेनेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधन करणार आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महविकास आघाडीमध्ये काही आलबेल नसल्याचे चर्चा राजकिय वर्तुळात सुरु होत्या. परंतु, संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळले असून अशा बातम्या पसरवल्या जात आहे. भाजपने कितीही भ्रम केला तरी त्यांना त्याचे फळ मिळणार नाही. महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Sanjay Raut
दापोली : खालिद रखांगे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; '3 कोटी आले पाहिजे'

तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक व अनिल देशमुख यांना राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही मतदान करण्यास नकार देण्यात आला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क डावलला जात आहे. 302 च्या कैद्याला मतदानाचा हक्क असतो. मात्र, या ठिकाणी कोणत्या कलमाप्रमाणे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानापासून वंचित करत आहे.

ज्याने जास्त उमेदवार उभारले आहे. त्यांना जास्त मते पाहिजे आणि आता 20 मतांची गरज आहे. 20 मते चोऱ्यामाऱ्या करून आणणार आहेत. ते दहशत आणि दबाव हे खुल्या प्रकारे करत आहे ही लोकशाही आहे. इथे तानाशाही चालणार नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com