Sanjay Raut : लोकसभेच्या अधिवेशनाआधी संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

Sanjay Raut : लोकसभेच्या अधिवेशनाआधी संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू होईल. साधारण 3 दिवस नवीन खासदारांचा शपथविधी होईल.
Published by :
Dhanshree Shintre

आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू होईल. साधारण 3 दिवस नवीन खासदारांचा शपथविधी होईल. इंडिया आघाडीचे खासदार आवारात मूळ गांधी पुतळा जवळ तिथं जमतील. 240 खासदार एकत्रित संसदेमध्ये प्रवेश करतील. प्रत्येकाच्या हाती संविधान प्रति असतील. संविधानाच्या प्रति कटिबद्ध आम्ही आहोत हे संदेश देऊन 240 खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील. आता मोदी, शाह आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतं. विरोधी पक्षनेता पहिल्या बाकावर असेल. 240 चे 275 होतील हे मोदी आणि शाहांना कळणार सुद्धा नाही. त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही असे संजय राऊत म्हणाले.

या देशात कायदा असेल तर वायकर यांना शपथ दिली जाणार नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पाहुयात कायद्याचे पालन होतंय का. आता आवाज घुमणार, मोदी आणि शाह यांचा आवाज चालणार नाही. आता 240 इंडिया खासदारांचा आवाज चालणार.

सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे. हे कायदेशीर आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. बांबू त्यांना लोकसभा निवडणुकीला लागलेला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सर्वांनी मिळून जो बांबू जो घातलाय तो निघालेला नाही. स्वप्नात बांबू गेलाय तो निघत नाहीये. विधानसभेला बा बांबू आरपार जाईल. आणि याच बांबूचे लोकं फटके मारतील असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी. तेलंगणामध्ये सरकारने पुन्हा एकदा कर्जमाफी केली. आमची मागणी आहे माननीय उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा शिवसेनेची या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का? आपल्याकडे कर्जमाफी झाली पाहिजे. आपल्याकडे सर्वात जास्त आत्महत्या सुरु आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com