दसरा मेळावा वादावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; परवानगी मिळाली नाही तर...

दसरा मेळावा वादावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; परवानगी मिळाली नाही तर...

दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने

मुंबई : राज्यात अभूतपुर्व गोंधळ सुरु असून दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांसमोर आले आहेत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन्ही गटात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आम्हीच घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यात आता शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत सध्या जेलमध्ये असून सोमवारी त्यांच्या कोठडीत 3 ऑक्टोवरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी सुनावणीसाठी संजय राऊत यांना न्यायालयात आणले असता विनायक राऊत यांच्यासह अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी त्यांची भेट घेतली, यावेळी संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी पार्कमध्ये मेळावा घ्यावा, असा सल्ला दिला आहे. यासंबंधीचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

दरम्यान, शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी न दिल्यानं दसरा मेळाव्यासाठी पर्यायी मैदान म्हणून दोन्ही गटांकडून बीकेसी येथील मैदानासाठी एमएमआरडीकडे अर्ज करण्यात आले होते. मात्र, एमएमआरडीएने शिंदे गटाने अर्ज केलेल्या मैदानासाठी परवानगी देताना शिवसेनेचा परवानगी अर्ज फेटाळला आहे. याउलट शिवसेनाही आता शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम झाली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्या वरून आता मुंबईत मोठे रामायण होण्याची शक्यता आहे.

Lokshahi
www.lokshahi.com