...तर मी राजीनामा देईल; सुषमा अंधारेंवर शिरसाट संतापले, आमदारकी गेली उडत

...तर मी राजीनामा देईल; सुषमा अंधारेंवर शिरसाट संतापले, आमदारकी गेली उडत

शिंदे गटाच्या नेते संजय शिरसाट यांच्या विधानाविरोधात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे.

मुंबई : शिंदे गटाच्या नेते संजय शिरसाट यांच्या विधानाविरोधात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे. तसेच, अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावरुन संजय शिरसाट संतापले असून महिला आहात म्हणून काहीही बोलाल का? अपमान केल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

...तर मी राजीनामा देईल; सुषमा अंधारेंवर शिरसाट संतापले, आमदारकी गेली उडत
मुख्यमंत्री आता डॉ.एकनाथ शिंदे; म्हणाले, मी छोटी-मोठी ऑपरेशन...

तुम्ही माझा व्हिडिओ व्यवस्थित पाहावा. असा मी कोणता गलिच्छ शब्द किंवा खालचा पातळीचा शब्द वापरला आहे. ज्यांना मी सन्मान देतो ती बाई माझ्याविरोधात सभेमध्ये बोलते. त्या संज्याला अटॅक आला होता. संजय शिरसाटांना आम्ही लडाने संज्या म्हणतो, असे ते म्हणतात. तुमचं वय काय माझे वय काय? मोठ्या भावाला किंवा वडिलांना या भाषेत बोलता का, असा सवाल संजय शिरसाटांनी केला आहे.

तुम्ही महिला म्हणून काही बोलालं ते आम्ही ऐकून घ्यायचं. आणि आम्ही एखादा शब्द बोललो तर महिला जगताचं अपमान झालं, असं करता हे स्टंटबाजी बंद करा. महिलांनी महिलांचे लिमिटमध्ये आणि पुरुषांनी पुरुषांच्या लिमिटमध्ये बोललं पाहिजे. दोघांनी लिमिट सोडता कामा नये हे संस्कार आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दिले आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

आता काही लोकांनी वरून फोन केले. आंदोलन करा आणि महिला आयोगाकडे जा. तुम्हाला कोणी अधिकार दिला. कृपया आमच्या नादाला लागू नका. उलटे-सुलटे वक्तव्य करू नका. जर तुम्ही केलं तर तुम्हाला यानंतर त्याच भाषेत उत्तर देईन, असा इशाराच संजय शिरसाटांनी सुषमा अंधारेंना दिला आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी परळी मध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विश्वास असून त्याच्या मस्तवाल लोकप्रतिनिधींना किमान आता तरी सुधारवाल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. मात्र त्यांनी कारवाई नाही केली तरी अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com