सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच; संजय शिरसाट म्हणाले, आम्ही उठाव...

सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच; संजय शिरसाट म्हणाले, आम्ही उठाव...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येणार आहे. शिंदे सरकारचं या सुनावणीवर भवितव्य अवलंबून आहे

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येणार आहे. शिंदे सरकारचं या सुनावणीवर भवितव्य अवलंबून आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी निकाल आमच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यासोबतच शिरसाटांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच; संजय शिरसाट म्हणाले, आम्ही उठाव...
शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार? राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच

उद्याचा जो निकाल येणार आहे त्या 16 मधील मी एक आमदार आहे. त्यामुळे आम्ही उठाव करताना कायदेशीर बाबी तपासल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार लागणार आहे, अशी आमची अपेक्षा आहे, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत. तर, आम्हाला निकलाबाबत तणाव वैगरे नाही. त्यांना निकाल अपेक्षित आहे. त्यांनी याचिका दखल केली होती. त्यांच्याकडे फार घटनातज्ज्ञ आहेत, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली. यावरही संजय शिरसाटांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांना राजभवनात का जावे लागले हा प्रश्न पडला आहे. मागील 25 वर्ष त्यांची सत्ता होती. म्हणून कोणताही टेंडर असू किंवा भरती असू हे मातोश्रीच्या परवानगी शिवाय होत नव्हती. मग मागील 25 वर्ष मुंबईमध्ये खड्डे का? हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.

या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले आहेत. लंडन, सिंगापूरमध्ये त्यांचे हॉटेल आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना घेणे-देणे नाही. मात्र, ठेकेदारावर बोलायचे ही आदित्य यांची रणनीती आहे. राज्याचे वाटोळे झाले तरी चालेल पण मुंबई परत द्या ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी मुंबईला ओरबडून खाल्ले आहे, अशी जोरदार टीकाही संजय शिरसाटांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com