पालकमंत्री पदानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार? संजय शिरसाट म्हणाले...

पालकमंत्री पदानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार? संजय शिरसाट म्हणाले...

पालकमंत्री पदानंतर मंत्रिमंडळ विस्तार असेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि सरकारमधील अस्वस्थता काहीशी अधोरेखित झाली. पालकमंत्री पदानंतर मंत्रिमंडळ विस्तार असेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. तेव्हा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार हा निश्चित होणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

पालकमंत्री पदानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार? संजय शिरसाट म्हणाले...
सुधीर मुनगंटीवारांकडून रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाचं ट्विट डिलीट

संजय शिरसाट म्हणाले की, पालकमंत्री वाटपामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. अजित पवार किंवा छगन भुजबळ यांच्यामध्ये देखील वाद नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल हे निश्चित. याचा फॉर्मुला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील. तसेच, दसरा मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांकडून अर्ज केला आहे. त्यावर निर्णय येणे अजून बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर बघू, असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.

नांदेड प्रकरणी संजय शिरसाटांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. ठाकरे गटाला या संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही. नक्कीच हा विषय दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयात सरकार आपली बाजू मांडेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com