संजय शिरसाटांविरोधात 3 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार : सुषमा अंधारे

संजय शिरसाटांविरोधात 3 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार : सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवरील वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना भोवण्याची शक्यता आहे

पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवरील वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना भोवण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे शिरसाटांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात सुषमा अंधारे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

संजय शिरसाटांविरोधात 3 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार : सुषमा अंधारे
'2014 साली पंतप्रधान मोदींची डिग्री बघून निवडून दिले होते का?' अजित पवारांचा मित्र पक्षांना घरचा आहेर

संजय शिरसाट यांच्याविरोधात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल व्हावी याची मागणी केली होती. मात्र, राज्यातील एकाही ठिकाणी तक्रार दाखल झालेली नाही. अमृता फडणवीस जरी पोहचल्या नाहीत तरी त्यांची तक्रार घेतली जाते. गणेश बिडकर यांचे व्हिडिओ व्हायरल होताच खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो. मात्र, आमची तक्रार दाखल होत नाही. महिला आयोगाच्या अहवालाची दखल घेतली नाही, अशी खंत सुषमा अंधारेंनी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांचे मी आभार मानते, विविध क्षेत्रातील महिलांनी भूमिका मांडली त्यांचे मी आभार मानते. चौकशी समिती बसवली आहे असं कळलं पण ही वेळकाढूपणा करण्याचे आहे, असा निशाणाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.

संजय शिरसाट दुसऱ्या वेळेस बोलताना सुद्धा अहंकारी भाषा वापरत असल्याचे दिसून आले. मी आज अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करत आहे. आधी त्यांना नोटीस देत आहोत. कोर्टमध्येही तक्रार दाखल करणार आहे. ३ रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा मी संजय शिरसाट यांच्यावर दाखल करत आहे. आम्ही मध्यम वर्गी आहोत आम्हाला अब्रू जपायची असते आम्हाला कुठल्या ही आर्थिक फायद्यासाठी हे करायचे नाही, असेही अंधारेंनी सांगितले आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी सुळे यांच्यावर तसेच गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांवर चाप बसण्याची गरज आहे. ते काय माफी मागणार आहेत? मी एक जबाबदार व्यक्ती आहे. लोकप्रतिनिधी यांच्याकडून हे विधानं होत आहेत आणि यावर काहीच कारवाई नाही झाली तर तळागाळातील महिलांना कशी मदत होईल, असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com