राजकारण
Video : संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच! शासकीय कॉलेजच्या प्राचार्याला केली मारहाण
शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले.
मुंबई : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे. माहितीनुसार, ठेकेदाराचे कॅन्टीन बिल पास न केल्याचा रागातून संतोष बांगर यांनी तंत्रनिकेतनच्या प्राचार्य उपाध्याय यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, याआधी संतोष बांगर यांनीही मंत्रालयाच्या गेटवरील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होती. तर, मंत्रालयाच्या गेटवरील पोलिसांना शिवीगाळ केली होती. तसेच, पिकवीमा कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे चिडलेल्या बांगर यांनी पिकवीमा कार्यालयात तोडफोड केली होती.