वर्ध्यात सरपंच, उपसरपंच्यासह नागरिकांचा भाजपात प्रवेश

वर्ध्यात सरपंच, उपसरपंच्यासह नागरिकांचा भाजपात प्रवेश

चंदेवाणी गट ग्राम पंचायतच्या सरपंच, उपसरपंचाचा काँग्रेसला रामराम
Published by :
Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे |वर्धा

राज्यासह देशात लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच नेत्यांची उलथापालथ होताना दिसत आहे. यातच वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघात भाजपच्या आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसच्या दिगग्ज नेत्यांचं भाजपात पक्षप्रवेश होताना दिसत आहे. कारंजा तालुक्यातील चंदेवाणी गट ग्राम पंचायतचे काँग्रेसचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांच्या सह शेकडो नागरिकांनी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला.

यावेळी सरपंच सविता इंगळे, उपसरपंच निखिल घोरमाडे, सदस्य शीला भुयार, ज्योती इंगळे,साधना कांबळे,राजेंद्र भुयार, अजय इंगळे, प्रदीप शेटे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.यावेळी आर्वी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार दादाराव केचे, माजी जिप अध्यक्ष सरिता गाखरे,तालुका भाजप अध्यक्ष चक्रधर डोंगरे, शहराध्यक्ष दिलीप जसुतकर, किशोर भांगे, विजय गाखरे यावेळी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com