Sudhir Tambe | Satyajeet Tambe
Sudhir Tambe | Satyajeet Tambe TEam Lokshahi

घराणेशाहीच्या पुढे जाऊन सत्यजीतसाठी जनतेने विचार करावा; सुधीर तांबेंचे आवाहन

तांबे कुटुंबियांनी संगमनेरमध्ये केले मतदान
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये त्यांचे वडील डॉ सुधीर तांबे, आई दुर्गा तांबे, आणि पत्नी मैथिली तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घराणेशाहीच्या पुढे जाऊन सत्यजीत यांच्यासाठी जनतेने विचार करावा, असे आवाहन सुधीर तांबे यांनी केले आहे.

Sudhir Tambe | Satyajeet Tambe
MLC Election : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सुरु

मी गेल्या 15 वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात सतत काम करत आहे. याचा चांगला प्रतिसाद सत्यजितला मिळत आहे. सर्वच लोक आमच्या सोबत आहे. व घराणेशाहीच्या पुढे जाऊन सत्यजीतसाठी जनतेने विचार करायला हवा, असे सुधीर तांबे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीत केंद्रस्थानी आला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. सत्यजित तांबे यांना कालच भाजपने पाठींबा जाहीर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com