Satyajeet Tambe | Shubhangi Patil
Satyajeet Tambe | Shubhangi PatilTeam Lokshahi

नाशिक पदवीधर मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळ

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे व मविआ उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सुरवातीलाच कांटे की टक्कर

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून येथील मतमोजणी सुरु झाली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे व मविआ उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सुरुवातीलाच कांटे की टक्कर दिसून येत आहे. अशातच, नाशिक पदवीधर मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे.

Satyajeet Tambe | Shubhangi Patil
कोकणातील विजयासाठी महाविकास आघाडीतून छुप्या मदती; गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरु झाली. दोघांच्याही मतांमध्ये वाढ होत असून येथेही सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात सामना रंगला आहे. परंतु, मतदानाच्या पहिल्या फेरीला सुरुवातीलाच टेबल क्रमांक 16 वर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. याची दखल घेत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे दाखल झाले आहेत.

तसेच, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर मतमोजणी पुन्हा एकदा सुरु झाली असून नाशिक पदवीधर मतदार निवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघणे महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com