राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटलांची पटोलेंवर जहरी टीका

राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटलांची पटोलेंवर जहरी टीका

बुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे एकाच मंचावर आले होते.

पंढरपूर : राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष, अशी जहरी टीका शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली आहे. सांगोल्याचे राष्ट्रवादीचे नेते बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.

राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटलांची पटोलेंवर जहरी टीका
शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घरगुती तमाशा; बावनकुळेंचे घणाघात

नाना पटोले म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष आहे. काँगेसकडे पद द्यायला माणूस नाही म्हणून नाना पटोलेंना पद दिलंय, असा टोला शहाजी बापू पाटलांनी पटोलेंना लगावला आहे. तर, सत्तासंघर्षाचा 12 तारखेला निकाल आमच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com