भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा, मात्र...; शहाजी बापूंचा दादांना टोला

भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा, मात्र...; शहाजी बापूंचा दादांना टोला

अमोल मिटकरींनीही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदी बसण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

संजय देसाई | सांगली : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे पोस्टर काही दिवसांपुर्वी वर्षा बंगल्याबाहेर झळकले होते. तर, अमोल मिटकरींनीही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदी बसण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा असते मात्र शिंदेंचे नेतृत्व भक्कम, असे त्यांनी म्हंटले होते. ते सांगलीत एका उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा, मात्र...; शहाजी बापूंचा दादांना टोला
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी केले तोंडभरून कौतुक; गतिशील आणि कष्टाळू...

भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा असते. मात्र सध्याचे शिंदेंचे नेतृत्व भक्कम आहे आणि सर्वांना न्याय देणारे आहे. त्यामुळे येणारी 2024 ची निवडणूक महायुती मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लढवेल आणि विजयी होईल, असे सांगत आमच्या सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सरकारला कसलाही धोका नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. याचबरोबर अजित दादांनी आमदारांना केलेल्या निधी वाटपाचे स्वागत करीत सर्व आमदार समाधानी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जयंत पाटील यांना निधी आणि आव्हाड यांना निधी दिला नाही. यावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो. त्यामुळे भविष्यात नगरविकासामधून निधी मिळेल. मात्र, मी तरी समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात एकीकडे पावसाचा हाहाकार आहे. मात्र, सांगोला तालुक्यात पावसाची ओढ असल्याने येथील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणीही शहाजी बापू पाटील यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com