ShahajiBapu Patil : सगळं व्यवस्थित होतं, पण राऊतांनी घोळ केला

ShahajiBapu Patil : सगळं व्यवस्थित होतं, पण राऊतांनी घोळ केला

शहाजीबापू पाटील यांनी साधला संजय राऊतांवर निशाणा

मुंबई : अडीच वर्षांपूर्वी सगळं व्यवस्थित चाललं होते. पण, शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) घोळ केला. सगळं संजय राऊतांमुळे घडलं, असा थेट आरोप बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांनी केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

ShahajiBapu Patil : सगळं व्यवस्थित होतं, पण राऊतांनी घोळ केला
Nilesh Rane : विनायक राऊत हे कोकणाचे 'क्राईम मास्टर गोगो

शहाजीबापू पाटील म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी सगळं व्यवस्थित चाललं होते. बहुमत होते, सगळं व्यवस्थित होतं. अडीच वर्षांपूर्वी राऊत कुठे मध्येच घुसले कळलंच नाही. परत आम्हाला कुठं घेऊन गेले तेही समजले नाही. सगळं व्यवस्थित होणार होतं. पण, राऊतांनी घोळ केला. सगळं संजय राऊतांमुळे घडलं, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे.

शहाजीबापू पाटील यांनी शेवटी काय डोंगर, काय हाटेल, काय शिंदे साहेबांचं नेतृत्व सगळं ओके, असा आपला फेमस डायलॉगही मारला. याला सभागृहानेही दाद दिली.

ShahajiBapu Patil : सगळं व्यवस्थित होतं, पण राऊतांनी घोळ केला
CM शिंदेंचा एक फोन अन् बिहारमध्ये अपघाताग्रस्त मराठी कुटुंबाला आणायला गेले विमान

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बंडखोर आमदारांनी अनेक वेळा संजय राऊतांवर शरसंधान साधले आहे. यानंतर शिंदे गटात इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरु झाली असल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. हे पाहता शिवसेनेने एक पाऊल मागे घेत खासदारांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com