संजय राऊत विश्व प्रवक्ते; शंभूराज देसाईंचा टोला

संजय राऊत विश्व प्रवक्ते; शंभूराज देसाईंचा टोला

अजित पवारांनी संजय राऊत यांना फटकारले; यावरुन शंभूराज देसाईंची टीका

मुंबई : राष्ट्रवादी नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु, अजित पवारांनी या चर्चांना फेटाळून लावले असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही वकीलपत्र घेऊ नये म्हणून फटकारले होते. यावरुन शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत कुठल्या पक्षाचे विश्वप्रवक्ते आहेत. स्वतः काही करायचे नाही आणि जे करतात त्यांच्यावर बोलायचे, असे टीकास्त्र शंभूराज देसाईंनी सोडले आहे.

संजय राऊत विश्व प्रवक्ते; शंभूराज देसाईंचा टोला
संजय राऊत स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हता म्हणून...; शिरसाटांचा चिमटा

संजय राऊत कुठल्या पक्षाचे विश्वप्रवक्ते आहेत. ते कोणत्या पक्षावर बोलत आहेत? काल अजित पवार म्हणाले कुणाचे वकील पत्र घेतले. अहो तुम्ही एका पेपरचे संपादक आहे. भाषा सभ्य असायला हवी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगले काम करत आहेत हे राऊतांना बघवत नाही. आठ दिवसांपूर्वी राज्यात गारपीट झाली पण संजय राऊत शेतावर गेलेत का? सकाळी 10 वाजता उठायचे आणि वाहिन्यांवर जाऊन मोठ्या गप्पा मारायच्या. स्वतः काही करायचे नाही आणि जे करतात त्यांच्यावर बोलायचे, अशी जोरदार टीका शंभूराज देसाईंनी संजय राऊतांवर केली आहे.

खारघर येथील सदोष मनुष्यवधप्रकरणी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी नाना पटोलेंनी राज्यपालांकडे केली होती. यावरही शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण राज्य सरकारने दिला. अतिशय नेटके नियोजन केले होते. दुर्दैवाने उष्णता वाढली त्यामुळे लोकांना त्रास झाला. नाना पटोले यांनी याचे राजकीय भांडवल करू नये. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी देखील सांगितले आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर देवेंद्र फडणवीसांनी झिरो पेडेन्सी हे ट्विट चर्चेत आले आहे. यावर शंभराज देसाई म्हणाले, काम करणारे सरकार आहेत. लोकांची कामे प्रलंबित राहू नये म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करत आहेत. झिरो पेडेन्सी हे आम्हाला आधीच सांगितले आहे. सर्वच मंत्रिमंडळाने झिरो पेडेन्सी ठेवली पाहिजे.

तर, अनेक रस्त्यांची कामे ठप्प झाली असून भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. मागील नऊ दहा महिन्यात वेगाने काम सुरू आहेत. त्यांच्या काळात ही काम झाली नाही ती आम्ही केली. या लोकांना नैराश्य आलेले आहे त्यामुळे ते बोलतात. कामे व्यवस्थित सुरू आहेत, असे प्रत्युत्तर देसाईंनी दिले आहे.

दरम्यान, मविआच्या बैठकीसंबंधात शंभूराज देसाईंना विचारले असता मी काय संजय राऊत यांच्या सारखा सर्वच पक्षात डोकावत नाही. मी फक्त भाजप आणि शिवसेनेबद्दल बोलेन संजय राऊत यांच्या सारखा विश्व प्रवक्ता मी नाही, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com