राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार, आदित्य ठाकरे होणार सहभागी

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार, आदित्य ठाकरे होणार सहभागी

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

नांदेड : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याबद्दल आशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात नांदेडमध्ये येणार आहे. सात नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये येईल. नांदेडमध्ये ही यात्रा पाच दिवस असणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तर, आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांना देखील काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आले असून ते होणार की नाही हे ते लवकरच सांगतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, सप्टेंबरपासून काँग्रेसची महत्वकांक्षी 'भारत जोडो यात्रा' सुरु झाली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही संपूर्ण भारत ही यात्रा होत आहे. देशभरात 3570 किमीचा प्रवास करत ही यात्रा संपणार आहे. 150 दिवसात ही पूर्ण होईल आणि 3,570 किमी अंतर पदयात्रा केली जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com