बाबरीप्रकरणी Sharad Pawar यांचा मोठा गौप्यस्फोट म्हणाले...
ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाईड’ या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना शरद पवार यांनी बाबरीप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृह सचिव माधव गोडबोले यांच्यासोबत मी त्या बैठकीला उपस्थित होतो. त्यावेळी विजया राजे सिंधिया यांनी बाबरी मशिदीला काहीच होणार नाही, असं आश्वासन नरसिंह राव यांना दिलं होतं.
तसेच भाजपवर विश्वास ठेवू नका. बाबरी मिशिदीला काहीच होणार नाही. आम्ही नरसिंह राव यांना सल्ला दिला. पण आमच्याऐवजी नरसिंह राव यांनी भाजपवर विश्वास ठेवला. विजया राजे यांचा हा सल्ला नरसिंह राव यांनी स्वीकारला. त्यानंतर मी, गृहमंत्री आणि गृहसचिवांनी नरसिंह राव यांना भाजपवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला होता. कारण काहीही होऊ शकतं असं आम्ही सांगितलं होतं. पण पंतप्रधानांनी भाजपवर विश्वास ठेवला. त्यानंतर काय झालं हे तुमच्यासमोर आहे. असे शरद पवार म्हणाले.