काही शक्तींकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न; शरद पवारांचे टीकास्त्र

काही शक्तींकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न; शरद पवारांचे टीकास्त्र

नगर शहरात हमाल मापाडी महामंडळाचे एकविसावे द्विवार्षिक अधिवेशन घेण्यात आलं आहे. या अधिवेशनात शरद पवार बोलत होते.

अहमदनगर : शेवगाव येथे काही शक्तींकडून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. नगर शहरात हमाल मापाडी महामंडळाचे एकविसावे द्विवार्षिक अधिवेशन घेण्यात आलं आहे. या अधिवेशनात ते बोलत होते.

काही शक्तींकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न; शरद पवारांचे टीकास्त्र
तुमची पदं भाजपामुळे आहेत हे विसरू नका; भाजप नेत्याचा शिंदे गटाला इशारा

शरद पवार म्हणाले की, नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जात असून अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले आहेत. याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती. काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवत आहे. त्या शक्तीशी लढाई करणं, संघर्ष करण्याचं आवाहन माझ्यासह तुमच्यासह सर्वांवर आहे. हे केलं नाही, तर कष्ट करणाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

कर्नाटकची निवडणूक भाजपा जिंकणार, असे सर्व देशाला वाटत होते. मात्र काल शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं सरकार सत्तेत आलं. यावेळी एक लाखापेक्षा अधिक लोक शपथविधीला हजर होते. त्यापैकी ७० टक्के तरुण सर्व जातीजमातीमधील होते. कर्नाटकात अनेक वर्ष काही लोकांचे राज्य होते. त्यांच्या सरकारच्या काळात माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले, असे म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com