राजकारण
Sharad Pawar 'या' दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर, दसरा चौकात होणार सभा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती असतील. या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.
दसरा चौकात त्यांची सायंकाळी चार वाजता जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार कोल्हापुरात येत आहेत. व्ही. बी. पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवार हसन मुश्रीफांविरोधात रणशिंग फुंकणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.