बच्चू कडू मविआत सामील होणार? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

बच्चू कडू मविआत सामील होणार? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आमदार बच्चू कडू मविआत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात कडू उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती : आमदार बच्चू कडू मविआत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात कडू उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. शरद पवार बच्चू कडूंच्या घरी जात त्यांची भेट घेणार असल्याचेही समजत आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू मविआत सामील होणार? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नितीन गडकरींकडून शरद पवारांचे कौतुक; म्हणाले, पंजाबराव देशमुख यांच्यासारखंच काम...

शरद पवार म्हणाले की, आघाडीची बैठक झाली काही सहकाऱ्यांनी सुचवलं की राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. उर्वरित काही भागात त्यांनी यात्रा करावी, अशी सूचना आम्ही केली होती. काँग्रेसची बैठक उद्या होणार आहे. लोकसभेच्या सूत्रांची अद्याप चर्चा झालेली नाही. येत्या १५ दिवसात चर्चा करू. आमची एकत्र बसून निर्णय घेऊ. मागील वेळी अमरावतीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात होती, अजूनही स्थानिक नेत्यांची मागणी आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, बच्चू कडू यांचा फोन आला होता. माझ्या गावातून तुम्ही जाताय त्यामुळे पाच मिनिटं घरी येऊन चहा घ्यावा, असे निमंत्रण दिलं. त्यामुळे मी उद्या जाणार आहे, असे शरद पवारांनी सांगितले. परंतु, बच्चू कडू हे महाविकास आघाडीत येणार या प्रश्नावर शरद पवार यांनी तुम्हाला कोणी सांगितले, असे म्हणत उत्तर देणे टाळले.

दरम्यान, राम मंदिर उभारण्यासाठी अनेकांचं योगदान आहे. राम मंदिराचं निमंत्रण मला आलेलं नाही. पुजेअर्चेत मी जातही नाही, आमचे श्रद्धास्थान जे आहे ते सांगायची गरज नाही. सत्ताधारी पक्षासमोर सामान्य जनतेचे कोणताही कार्यक्रम नाही म्हणून ते मंदिर मुद्दा पुढे करत आहे, असा निशाणा शरद पवारांनी मोदी सरकारवर साधाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com