Sharad Pawar : पक्ष आणि चिन्हाबाबत सेटलमेंट करुन निर्णय घेतला गेला

Sharad Pawar : पक्ष आणि चिन्हाबाबत सेटलमेंट करुन निर्णय घेतला गेला

बारामतीमधून शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

बारामतीमधून शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्ष, चिन्हाबाबत असा निर्णय होईल याची खात्री होती. शिवसेनाबाबतही असाच निर्णय झाला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलोय. पक्ष आणि चिन्ह इतरांना देणं असं कधी घडलं नाही.

सुप्रीम कोर्टात जाण्याची आम्ही तयारी केली आहे. राष्ट्रवादीची स्थापना कुणी केली हे सर्वांना माहित आहे. आयोगाचा असा निर्णय हा अन्यायकारक. आमच्याकडून भावनिक राजकारण होणार नाही. कुणाला भावनिक करण्याचा प्रश्नच नाही. बारामतीतील जनतेला सर्व गोष्टी माहित आहेत. लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु.

पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय सेटलमेंट करुन घेतला गेला. जनता आमच्यासोबत आहे. निवडणुकीला उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार. धनंजय मुंडेंपेक्षा जितेंद्र आव्हाडांनी पक्षासाठी अधिक काळ काम केलं. बारामतीत कुणी किती कामं केली हे जनता जाणते.असे शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com