शरद पवारांचा OBC उल्लेख असलेला दाखला व्हायरल; शरद पवार म्हणाले...

शरद पवारांचा OBC उल्लेख असलेला दाखला व्हायरल; शरद पवार म्हणाले...

आज दिवाळीचा पाडवा सर्वत्र साजरा होत आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

आज दिवाळीचा पाडवा सर्वत्र साजरा होत आहे पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत येत असतात या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या दाखल्यात शरद पवारांचा प्रवर्ग हा ओबीसी असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

यावर प्रतिक्रिया देत शरद पवार म्हणाले की, सर्व जगाला माझी जात कोणती हे माहित आहे. माझ्याबाबतचे खोटे दाखले व्हायरल केले. जन्माने दिलेली जात लपत नाही. जातीवरुन राजकारण, समाजकारण केलं नाही. माझा ओबीसी असल्याचा चुकीचा दाखला व्हायरल केला. ओबीसी समाजाबाबत मला आस्था आहे. सोशल मीडियावरील इंग्रजीतला दाखला खोटा आहे. काही लोकांकडून हे खोटं व्हायरल करण्यात आलं. असे शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com