'त्या' निर्णयाचा थेट परिणाम देशातंर्गत उत्पादकांवर; शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

'त्या' निर्णयाचा थेट परिणाम देशातंर्गत उत्पादकांवर; शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांना पत्र लिहीले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पत्र लिहीले आहे. केंद्रीय दुग्धविकास खात्याकडून डेरी प्रॉडक्ट यामध्ये लोणी आणि तूप या दुग्धजन्य पदार्थांचे आयात करण्याच्या निर्णयावर शरद पवारांनी हे पत्र लिहीले आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

'त्या' निर्णयाचा थेट परिणाम देशातंर्गत उत्पादकांवर; शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
सत्तावादी बनलेल्या भाजपास सत्यवादी बनण्यासाठी शुभेच्छा; रोहित पवारांचा टोला

काय आहे शरद पवार यांचे पत्र?

केंद्रीय दुग्धविकास खात्याकडून डेरी प्रॉडक्ट यामध्ये लोणी आणि तूप या दुग्धजन्य पदार्थांचे आयात करण्याचा इरादा असल्याची बातमी वाचण्यात आली आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणे हे कदापि मान्य होणारे नाही. कारण जर अशा पदार्थांची आयात करायची असेल तर त्याचा थेट परिणाम देशांतर्गत दूध उत्पादन करणाऱ्या उत्पादकांच्या वर होताना पाहायला मिळणार आहे.

नुकतेच असे व्यावसायिक कोविड-19 च्या संकटातून बाहेर पडले आहेत जर असा निर्णय झाला तर त्याचा पुन्हा एकदा या व्यवसायिकांवर परिणाम होताना पाहिला मिळणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की या निर्णयाचा अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार व्हावा, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com