शिंदे गटाने दसरा मेळावा घ्यायचा असेल तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा; असं कोण म्हणाले?

शिंदे गटाने दसरा मेळावा घ्यायचा असेल तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा; असं कोण म्हणाले?

शिंदे गटाने दसरा मेळावा घ्यायचा असेल तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा
Published by :
Siddhi Naringrekar

रोहन नाईक, सिंधुदुर्ग

शिंदे गटाने दसरा मेळावा घेऊच नये आणि घ्यायचा असेल तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलीय. मोदी- शहांची मोठेपण गाणाऱ्यांना शिवसेनेचे विचार मांडण्याचा कुठलाही अधिकार नाही. यांच्या हातात आता पक्षाची धोरण राहिलेली नाहीत तर ती भाजपच्या हातात असून शिंदे गटाची भूमिका भाजप ठरवणार अशा शब्दात वैभव नाईक यांनी शिंदे गटाचा समाचार घेतलाय.

तर शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यापेक्षा पंतप्रधान मोदींची सभा घ्यावी. भाजपमध्ये तुमचा पक्ष विलीन होईल. शिवसेनेमध्ये अडथळे आणण्यासाठी शिंदे गटाचा वापर केला जातोय. यांच्या मेळाव्याला गर्दी कशी होते ? मागील वर्षी मेळाव्यात कोण उत्तर भारतीय होते, कोण बिहारी होते, कोण भाषण करताना लोक उठून गेले ? हे सगळ्यांनी पाहिलंय. शिवतीर्थावर एकही रुपया न देता जी गर्दी होते, ती शिवसेनेच्या विचारांचं सोन लुटायला येतात. मात्र, तुमची गर्दी विचारांची नसते, अशी टीकाही आमदार वैभव नाईक यांनी केलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com