मशालीला ढाल-तलवारीचे आव्हान! शिंदे गटाला मिळाले अखेर चिन्ह

मशालीला ढाल-तलवारीचे आव्हान! शिंदे गटाला मिळाले अखेर चिन्ह

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नवे नाव व चिन्ह मिळाले. परंतु, शिंदे गटाला नाव मिळाले असले तरी चिन्ह मिळाले नव्हते. अखेर आज संध्याकाळी शिंदे गटाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहे.

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर ठाकरे गटाला नवे नाव व चिन्ह मिळाले. परंतु, शिंदे गटाला नाव मिळाले असले तरी चिन्ह मिळाले नव्हते. अखेर आज संध्याकाळी शिंदे गटाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहे. ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे.

शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक आयोगाने शनिवारी गोठवले. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं सोमवारी निवडणूक आयोगामध्ये नवीन चिन्ह आणि नावासाठी कागदपत्रे जमा केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेत ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असे नाव व मशालीचे चिन्ह दिले. तर, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाला मंजुरी दिली. परंतु, शिंदे गटाची तिन्ही चिन्ह आयोगाने नाकारली.

यानंतर आज नव्याने शिंदे गटाने दोन स्वतंत्र ई-मेलद्वारे सहा चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले होते. यात तळपता सूर्य, ढाल-तलवार, पिंपळाचे झाड, तुतारी, रिक्षा शंख हे सहा पर्याय शिंदे गटाने दिले होते. यातील तळपत्या सूर्यासाठी शिंदे गट आग्रही होता. परंतु, संध्याकाळी निवडणूक आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह मंजूर केले आहे.

मशालीला ढाल-तलवारीचे आव्हान! शिंदे गटाला मिळाले अखेर चिन्ह
शिवसेना अन् मशालीचं नात जुनंच; खुद्द छगन भुजबळांनी सांगितला किस्सा

दरम्यान, निवडणूक आयोगाने उगवता सुर्य, त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली होती. यानंतर आज नव्याने चिन्हे सादर करण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com