Ambadas Danve |
Ambadas Danve |

शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची दानवेंवर शेलक्या शब्दात टीका, म्हणाले, मुलीच्या वयाच्या...

माणसांनी पायांनी लगड असावं पण चारित्र्यांनी लगड नसावं

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये टीका करताना तोल जाताना वारंवार दिसत आहे. अशातच शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांचा वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. काल औरंगाबाद महाप्रबोधन यात्रेत बोलत असताना ठाकरे गट जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या औरंगाबादमधील नेत्यांवर विखारी टीका केली होती. त्यालाच उत्तर देताना आता शिंदे गटातील औरंगाबाद जिल्हाप्रमुखांनी शेलक्या शब्दात दानवेंवर टीका केली आहे.

Ambadas Danve |
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरून दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले, दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर...

शिंदे गटातील जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी अंबादास दानवे यांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, माणसांनी पायांनी लगड असावं पण चारित्र्यांनी लगड नसावं. स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करण्या इतकं, अश्या शब्दात राजेंद्र जंजाळ यांनी अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी अशी टीका केल्यामुळे औरंगाबादमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाढ वाढण्याची शक्यता निर्माण झाले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com