Gulabrao Patil
Gulabrao PatilTeam Lokshahi

गुलाबराव पाटलांचा अंधारेंवर निशाणा म्हणाले, हे राष्ट्रवादीतून आलेलं पार्सल...

शिवसेनेच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्या भाषणांवर जळगावात बंदी घालण्यात आली.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट चांगलाच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाने सध्या राज्यभर महाप्रबोधन यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेची संपूर्ण जवाबदारी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर सोपवली आहे. या यात्रे दरम्यान सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. त्यावरून आता शिंदे गटाचे आमदार, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे.

Gulabrao Patil
वाद पेटणार! श्रीकांत शिंदेंच्या सभेला परवानगी तर आदित्य ठाकरेंना नाकारली

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

सुषमा अंधारे यांच्यावर बोलताना पाटील म्हणाले की, सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून आलेलं पार्सल आहे आणि उरली सुरली शिवसेनादेखील त्या संपवून टाकतील. ठाकरे गटानं सावध व्हावं. ही महाप्रबोधन यात्रा नव्हे तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे. हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. अशी जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी अंधारेंवर केली आहे.

सुषमा अंधारे यांची शिवसेनेच्या वतीने महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. काल त्या जळगावमध्ये होत्या. या कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्या भाषणांवर जळगावात बंदी घालण्यात आली. त्यावरून शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे व ठाकरे गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com