Sanjay Gaikwad | Sanjay Raut
Sanjay Gaikwad | Sanjay RautTeam Lokshahi

बाळासाहेबांनी राऊतांना पायाखाली तुडवलं असत; का म्हणाले गायकवाड असे?

आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या या राऊतासह सगळ्यांना पायाखाली तुडवले असते.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. याच दरम्यान आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आणि (शिंदे गट) यांच्यात वाद सुरु असताना आज जयंतीदिनी बाळासाहेबांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. याच व्हिडिओबद्दल बोलत असताना एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Gaikwad | Sanjay Raut
हे राज्यपाल उद्या जाण्याऐवजी...; नाना पटोलेंचे टीकास्त्र

काय म्हणाले संजय गायकवाड?

बाळासाहेब ठाकरे हयात असताना 1990-91 च्या आसपास शिवसेनेचे काही आमदार फुटले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी ते आवाहन केले होते. आम्हीही शिवसैनिक म्हणून मोर्चे काढले होते. पण त्यावेळी जे आमदार फुटले होते, ते हिंदुत्वाशी गद्दारी करून फुटले होते. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी ‘त्यांना तुडवा’ असं सांगितले होते. आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करून नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन बाहेर पडलो आहोत. आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या या राऊतासह सगळ्यांना पायाखाली तुडवले असते. अशी जोरदार टीका त्यांनी संजय राऊतांवर यावेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com