Eknath Shinde | Sanay Raut
Eknath Shinde | Sanay RautTeam Lokshahi

जेलमधून आल्यापासून राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय; शिंदे गटाचा टोला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते. यामुळे निकाल आमच्या बाजूने लागणार असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत हे जेलमधून आल्यापासून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आपल्याकडचे आमदार, नगरसेवक सांभाळा. नंतर सरकार पाडण्याचा गप्पा मारा, असा टोला नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

Eknath Shinde | Sanay Raut
घरातील सदस्यांपेक्षा आपल्या ड्रायव्हरला जास्त माहिती असते; असं अजित पवार का म्हणाले?

नरेश म्हस्के म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते. बहुमत हे लोकशाहीमध्ये महत्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल. हजारो कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत हजारो उमेदवार आमचे निवडून आलेत. लोकप्रतिनिधी आमच्याकडे आहेत बहुमत आमच्याकडे असल्याने निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तर, संजय राऊत हे जेलमधून आल्यापासून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. उरलेले आमदार आणि खासदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार आहेत. नाशिकमध्ये जाऊन मोठमोठ्या गप्पा मारल्या. पण, नाशिकमधील नगरसेवक आणि कार्यकर्ते हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. संजय राऊत यांना जाहीर सांगतो कोण कुठे जाणार हे येत्या काही दिवसात कळेल. आपल्याकडचे आमदार, नगरसेवक सांभाळा. नंतर सरकार पाडण्याचा गप्पा मारा, असा निशाणा नरेश म्हस्के यांनी साधला आहे.

Eknath Shinde | Sanay Raut
फडणवीस तुम्ही नवखे आहात, तरीही शरद पवारांवर... : भास्कर जाधव

दरम्यान, संजय राऊत यांनी आज घटनेचा हातोडा घटनाबाह्य सरकारवर पडल्याशिवाय राहणार नाही. राजकीय दबावापोटी केंद्राच्या ते डाव उधळला जाईल आणि या देशांवर घटनांनी न्याय निर्माण केला आहे ते शाबूत आहे हे देशाला दिसून येईल. आणि आम्ही संपूर्णपणे तयारी यासाठी केलेले आहे. जे गेलेले आहे त्यांच्यामुळे काही फरक पडत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com