शिरसाट व बच्चू कडूंना मिळणार मंत्रिमंडळात स्थान; दीपक केसरकरांची माहिती

शिरसाट व बच्चू कडूंना मिळणार मंत्रिमंडळात स्थान; दीपक केसरकरांची माहिती

आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

कोल्हापूर : आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच संजय शिरसाटांनी ट्विटवर उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ शेअर केला होता. आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात आहेत. परंतु, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिरसाट आणि बच्चू कडू यांचा समावेश करणार असल्याचे सांगितले आहे

संजय शिरसाट यांच्याबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, संजय शिरसाट यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिरसाट आणि बच्चू कडू यांचा समावेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे सध्या तरी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या नाराजींच्या वृत्तांना पूर्णविराम लागण्याची चिन्हे आहेत.

पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार. ती मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, कुठंही चुकीची घटना घडणार नाही. पंचनामे करून मदत दिली जाणार आहे. विम्याच्या पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यावरही चर्चा झाली आहे, अशीही माहिती केसरकरांनी दिली आहे.

बंडावेळी थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले होते. यावर केसरकर यांनी कोणत्याही छोट्या शब्दातून वेगवेगळे अर्थ काढणं चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी शहीद शब्द वापरला तो चुकीचा नाही. गडचिरोलीत शिंदे हे नक्षलग्रस्त भागात काम करत होते. अनेक धमक्या त्यांना आल्या. त्यावेळी जर कुठं दगाफटका झाला असता तर ते शहीदच झाले असते. पालकमंत्री असताना त्यांना कडेकोट सुरक्षा देणे गरजचे होते, अशी सारवासारव केली.

आम्ही गट नाही तर आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा दीपक केसरकरांनी पुन्हा केला आहे. प्रॉपर्टी कितीही वेळा उभारता येते. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालतो. शिवसेनेची मुंबईतील प्रॉपर्टी बळकवण्याठी आम्ही काही करत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. त्यामुळं कोठडी वाढत आहेत. पत्राचाळ प्रकरण हा घोटाळा झाला आहे. त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे असण्याची शक्यता आहे. हा मुंबईतील एका मोठ्या घोटाळ्यापैकी एक घोटाळा आहे. या मोठ्या घोटाळ्यातील इतर अनेकजण आत आहेत. तर राऊत मात्र बाहेर होते

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com