'शिवसेना बाळासाहेब ठाकरे'; एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं

'शिवसेना बाळासाहेब ठाकरे'; एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं

नावाची अधिकृत घोषणा संध्याकाळी होण्याची शक्यता

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे शिवसेनेतून (Shivsena) आमदारांची इनकमिंग सुरुच असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Shivsena Balasaheb Thackeray) असे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या नावाची अधिकृत घोषणा संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.

गुवाहाटीतील बंडखोर आमदारांची आज बैठक होणार असून पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी शिंदे गट नावाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, भाजपही आता सक्रिय झाली असून भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार आता लवकरच कोसळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

'शिवसेना बाळासाहेब ठाकरे'; एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं
बैठकांचे सत्र! भाजप, शिवसेना, बंडखोर आमदारांची आज महत्वाची बैठक

दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिवसेना नाव न लावता जगून दाखवा, असे थेट आव्हान बंडखोर शिवसेना आमदारांना केले होते. त्याच शिंदे गटाकडून आता 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असं गटाचं नाव ठेवल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता उध्दव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com