दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात; शिवसेनेची याचिका दाखल

दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात; शिवसेनेची याचिका दाखल

शिवसेनेच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

मुंबई : दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना व शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. शिंदे गटाला बीकेसी मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेना अद्यापही मैदानापासून वंचित आहे. या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेत अर्ज दाखल केला होता. परंतु, सुरक्षेचे कारण पुढे पालिकेने करत शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळाव्यास परवानगी दिली आहे. परंतु, शिवसेनेला अद्याप कोणतेही मैदान दिलेले नाही. अखेर आज शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी याचिका दाखल केली आहे. शिवसेनेच्या या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती आरडी धानुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

Lokshahi
www.lokshahi.com