अलिबाबा अन् 40 चोरांचे 25 घोटाळे बाहेर काढणार : संजय राऊत

अलिबाबा अन् 40 चोरांचे 25 घोटाळे बाहेर काढणार : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे

कल्पना नळस्कर | मुंबई : महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मंत्री भ्रष्टाचारासाठी चाललेलं हे सरकार आहे आणि या 40 मंत्री आणि आमदारांचे 25 भ्रष्टाचाराचे प्रकरण आमच्याकडे आहेत, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. ते आझ माध्यमांशी बोलत होते.

अलिबाबा अन् 40 चोरांचे 25 घोटाळे बाहेर काढणार : संजय राऊत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिंदे सरकारकडून समिती स्थापन

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात भविष्यात राजकीय परिवर्तन, क्रांती मोठ्या प्रमाणात होणार आहे. या संदर्भातील पाऊल पडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक घटक हे जवळ येत आहेत. एकत्र काम करून महाराष्ट्रात आणि देशात काम करण्यासंदर्भात आमच्यात एक मत आहे.

मुंबई केंद्र शासिक करण्याची मागणी एका नेत्याने केली होती. यावर ते म्हणाले, आमच्या बांधवांवर अत्याचार होत नाही. मुंबईत संपूर्ण देश सामावला आहे. फक्त कर्नाटक नाही तर मुंबईमध्ये मराठी माणसासोबत बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात सर्व प्रांताचे लोक गुण्या गोविंदाने राहतात आणि आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो तसे सीमा भागात होतंय का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आधी सीमा भाग केंद्रशासित होईल, कारण तिकडे मराठी बांधवांवर गेले 75 वर्षे अत्याचार होत आहेत म्हणून आम्ही ती मागणी करत आहोत. मूर्ख आहेत ते मंत्री जे ही मागणी करत आहेत,

एकाच प्रकारच्या मंत्र्यांची प्रकरण बाहेर येत आहेत. काही लोक म्हणतात बॉम्ब कधी फुटतात, ही सुरुवात आहे. हे टोकन आहे. संजय राठोड यांच्या दोन जमिनीचे प्रकरण, अब्दुल सत्तार यांचे कलेक्शन, कृषी कर्मचाऱ्यांना पकडून कोट्यावधी रुपये जमा केले जात आहे. 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली. या क्षणी या आमच्याकडे 25 प्रकरण पडली आहेत. पण, आमच्यासाठी सीमा प्रश्न ठराव महत्त्वाचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की सीमा प्रश्नाचा ठराव होत असताना इतर प्रकरण घेऊ नये.

अलिबाबा अन् 40 चोरांचे 25 घोटाळे बाहेर काढणार : संजय राऊत
शिवसेना आमदार नितीन देशमुखांवर नागपुरात गुन्हा दाखल

मी आजच्या हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन चालणं भारतीय जनता पक्षाला जड होत आहे. कारण भारतीय जनता पक्ष यांची बदनामी होत आहे. महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मंत्री भ्रष्टाचारासाठी चाललेलं हे सरकार आहे आणि हे सर्व लोक अलिबाबा 40 चोर यामध्ये आहेत आणि हळूहळू चाळीस मंत्री आणि आमदार यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येतील,

जयंत पाटलांनी जो शब्द वापरला होता निर्लज्ज सरकार, गेंड्याच्या कातडीचा सरकार तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे कितीही पुराचा पुरावे दिले तरी आम्ही खुर्चीला चिटकून राहू. नैतिकता नाही. प्रामाणिकचा नाही आणि महाराष्ट्रावर्षी प्रेम नाही असे सरकार आहे थोडी जरी नैतिकता असती तर या अधिवेशनामध्ये चार मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री घेतले असते, अशीही टीका संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकरावर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com