Shiv Sena Bhavan
Shiv Sena BhavanTeam Lokshahi

Maharashtra Political Crisis : बंडखोरांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडे, पाच ठराव संमत

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक शिवसेना भवनात झाली. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक शिवसेनेसाठी महत्वाची आहे.
Published by :
Team Lokshahi

Maharashtra Political Crisis : शिवसेना भवनात शिवसेना कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत विविध ठराव पारीत करण्यात आले. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक शिवसेनेसाठी महत्वाची आहे. बैठकीत शिवसेनेच्या बंडखोरांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. बैठकीला संजय राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते. कार्यकारणीत एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्यांवर कारवाई नाही. त्यांचे पक्षनेतेपद कायम ठेवण्यात आले.

Shiv Sena Bhavan
बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांचे संरक्षण काढले, एकनाथ शिंदे आक्रमक

बैठकीतील महत्वाचे निर्णय

१) बंडखोरांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

२) बाळासाहेब ठाकरे हे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही.

३) उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत केलेल्या कामांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव

४) शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे अभिनंदन करण्यात आले.

५) राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाबाबत अभिनंदन करण्यात आले.

Shiv Sena Bhavan
शिंदेच्या टि्वटमुळे टि्वस्ट : शिवसेना कोणाची? शिंदेची की उद्धव ठाकरेंची?

बैठकीत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यांवर चांगलेच आक्रमक झाले. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते आता दास झाले. बंडखोरांना त्यांचा निर्णय घेऊ द्या.

रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबतच आहे. परंतु माझ्या मुलांना त्रास दिला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com