uddhav thackeray | raj thackeray
uddhav thackeray | raj thackeray team lokshahi

ठाकरे बंधू एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बाळासाहेबांवर आजही निष्ठा आहे; शर्मिला ठाकरे
Published by :
Shubham Tate

sharmila thackeray : राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. “साद घातली तर येऊ देत.. मग बघू,” असं शर्मिला ठाकरे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. “कोणताही पक्ष संपत नसतो. तुम्ही कोणताही पक्ष पाहा तो पुन्हा लढत असतो. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरूवात केली. खालचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांची बाळासाहेबांवर आजही निष्ठा आहे. (shiv sena Uddhav Thackeray leader uddhav raj thackeray get sharmila thackeray)

uddhav thackeray | raj thackeray
12 आठवड्यात धूम्रपानापासून मिळणार मुक्ती

त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेने पुढाकार घेतला तर ही युती होऊ शकते असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

पुण्यात एका साडीच्या दुकानाच्या उद्घाटनाला शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणाबद्दल टीप्पणी करण्यास नकार दिला होता. मात्र पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना नक्की स्थान मिळेल, भाजपकडे चांगल्या महिला नेत्या आहेत. यात पंकजा मुंडे आहेत, त्यांच्याकडे मंत्रीपद गेले तर चांगले आहे. त्यांनी मागच्यावेळी चांगले काम केले होते, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हणत पंकजा मुंडे यांच्या कामाची स्तुती केली. तसेच महिला आणि बालविकास हे खाते महिलेकडे असेल तर अधिक चांगले होईल, आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यास मदत देखील होईल अस त्या म्हणाल्या.

uddhav thackeray | raj thackeray
शाहरुख खानच्या आजोबांनी लाल किल्ल्यावरून ब्रिटिश ध्वज उतरवत तिरंगा फडकवला होता

मी मुलावर, पतीवर लक्ष ठेवून असते

शर्मिला ठाकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, मी इतर पक्षांवर टीका करणार नाही. सरकार काय करत आहे काय करत नाही, यापेक्षा मला कुटुंब महत्वाचे आहे. माझा मुलगा काय करत आहे, माझा नवरा काय करत आहे किंवा माझा पक्ष काय करत आहे याच्यावर मी लक्ष ठेवून असते, शिवसेनेवर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com