काँग्रेसकडून सावरकरांचा पुन्हा अपमान! वडेट्टीवारांच्या कन्येच्या वक्तव्याने वाद; बलात्काराला राजकीय हत्यार...

काँग्रेसकडून सावरकरांचा पुन्हा अपमान! वडेट्टीवारांच्या कन्येच्या वक्तव्याने वाद; बलात्काराला राजकीय हत्यार...

महाविकास आघाडीत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावकरांबाबत केलेल्या विधानावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याविरोधात भाजपने आक्रमक होत सावरकर गौरव यात्राही काढली होती. तर, उध्दव ठाकरेंनी राहुल गांधींना इशारा दिला होता. हे वातावरण शांत होता न होताच पुन्हा एकदा काँग्रेसकडून सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून सावरकरांचा पुन्हा अपमान! वडेट्टीवारांच्या कन्येच्या वक्तव्याने वाद; बलात्काराला राजकीय हत्यार...
संदीपान भुमरेंच्या टीकेला खैरेंचे उत्तर; हा दहा दिवसांचा पालकमंत्री

काय म्हणाल्या आहेत शिवानी वडेट्टीवार?

हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात. सावरकर मला आणि माझ्यासोबत महिला, भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते. सावकर म्हणायचे, की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हा तुम्ही आपला राजकीय विरोधकाविरुध्द वापरलं पाहिजे. मग, माझ्या सारख्या इथे उपस्थित महिला-भगिनींना कसं सुरक्षित वाटेल. आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात, असे शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात म्हंटले आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सभेतून कॉंग्रेसला दिला होता. यानंतर संभाजीनगर येथील वज्रमुठ सभेलाही नाना पटोलेंनी अनुपस्थित होते. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु, तिनही नेत्यांनी बिघाडीच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. परंतु, शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वादाला नवी फोडणी मिळाली आहे. यामुळे आता उध्दव ठाकरे कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com