Thackeray Group : लोकसभेसाठी ठाकरे गटाचा परभणीचा उमेदवार ठरला?

उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
Published by :
Team Lokshahi

उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. परभणीसाठी विद्यमान खासदार बंडू जाधव हेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाला इंडिया आघाडीमध्ये जागा मिळाल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार उत्तम खंदारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com