maharashtra political crisis : आणखी एका जिल्हाप्रमुखाने उध्दव ठाकरेंची साथ सोडली

maharashtra political crisis : आणखी एका जिल्हाप्रमुखाने उध्दव ठाकरेंची साथ सोडली

साताऱ्याचे शिवसेना (shivsena) जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) (मपोल) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना वाढदिवसादिवशी जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

प्रशांत जगताप |सातारा : साताऱ्याचे शिवसेना (shivsena) जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) (मपोल) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना वाढदिवसादिवशी जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मी शिवसेनेतच असून पक्ष सोडलेला नाही असे सांगत एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने विकासकामे होण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देत असल्याचे चंद्रकांत जाधव यांनी सांगितलेय. मागील आठवड्यात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याने उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत.

maharashtra political crisis : आणखी एका जिल्हाप्रमुखाने उध्दव ठाकरेंची साथ सोडली
PMLA : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पीएमएलए कायद्यातील तरतुदी कायम राहणार

सातारा जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा एक मोठा धक्का बसणार आहे. चंद्रकांत जाधव हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहेत. त्यांनी उपजिल्हाप्रमुखपदही भूषविले आहे. सध्या त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद होते. त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठे काम केले आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्याबरोबर आणखी काही पदाधिकारीही जाण्याची शक्यता आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com