'हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बोम्मईंचं थोबाड रंगवल असतं'

'हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बोम्मईंचं थोबाड रंगवल असतं'

कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपासह शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे.

मुंबई : कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपासह शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ‘अरे’ला ‘कारे’ करण्याचा इशारा दिला होता. यावरुन सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

'हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बोम्मईंचं थोबाड रंगवल असतं'
महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात आशर यांचा मोठा आर्थिक हातभार; शिवसेनेचा आरोप

शिंदे-फडणवीस सरकारने कानडी मुख्यमंत्र्यांच्या मनमानीपुढे बुळचट धोरण स्वीकारले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी उठून महाराष्ट्राला बेईज्जत करण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केलाय. त्यावर विरोधी पक्षांना एकत्र येऊन वज्रमुठीचा ठोसा मारावा लागेल. आता भाजपच्या आशिष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ‘‘कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.’’ भाजपचे हे ढोंग आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना तेथील सरकारने बेळगावात येण्यापासून रोखले. महाराष्ट्राच्या शेकडो गावांवर त्यांनी हक्क सांगितला. त्यामुळे प्रकरण ‘अरे’च्या पुढे गेले आहे व ‘कारे’वाले शेपूट घालून बसले आहेत. ‘अरे’ला ‘कारे’करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते, अशा शब्दांत शिवसेनेने शिंदे-फडणवीसांवर टीका केली आहे.

मुळात जे छत्रपती शिवरायांचा अपमान निमूट सहन करतात त्यांनी ‘कारे’ची भाषा करावी हाच एक विनोद आहे. महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आजही एका सुरात हे ठणकावून बोलायला तयार नाहीत की, ‘‘बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्राचाच! आणि तो पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.’’ शिंदे-फडणवीस यांनी एकदा तरी ही गर्जना केली काय? तिकडे कानडी मुख्यमंत्री सीमाभागासाठी लढतात, महाराष्ट्राच्या गावांवरही दावा ठोकतात व महाराष्ट्र सरकारचे शेलारमामा नेभळटासारखे फक्त ‘अरे’ ला ‘कारे’ बोलू असे बोलतात! हे म्हणजे असेच झाले की, चीनने लडाखमध्ये घुसून आपला भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर ‘आम्ही त्यांना आमची इंचभरही जमीन त्यांना घेऊ देणार नाही,’ असा दम भरायचा! अरे बाबांनो, ते आधीच हातभर आत घुसले आहेत. तसेच महाराष्ट्रात घडले आहे. कानडी सरकारची ही ‘घुसखोरी’ फक्त नेभळट, लाचार आणि गुजरातच्या ताटाखालचे मांजर बनलेले सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यामुळेच सुरू आहे, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

'हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बोम्मईंचं थोबाड रंगवल असतं'
वंचित बहुजन आघाडी-शिवसेना युतीवर होणार शिक्कामोर्तब? उद्या ठाकरे- आंबेडकरांमध्ये पहिली बैठक

खोके सरकारचे आमदार महिलांना गलिच्छ भाषेत शिव्या देतात. दुसरे आमदार शिवसेना नेत्यांना आई-बहिणीवरून कॅमेऱ्यासमोर शिव्या देतात. अशा नव्या विकृतीचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे. तो एकत्रित मोडून काढावाच लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहेत. त्यावर ठोस भूमिका घेतली आहे असे कुठेच दिसत नाही. शिंदे-फडणवीस सरकार हे मर्जीतल्या चाळीसेक खोकेबाज आमदार व बिल्डर ‘मित्रां’साठी सुरू आहे. शिवरायांचा अपमान व जनता गेली उडत असे कोणास वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. विरोधी पक्षाने आता नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करावा. ती वेळ आलीच आहे! अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखविण्यासाठी हिंमतबाज मर्दाचे मनगट लागते. ते लवकरच दिसेल, अशी टीका शिवसेनेने आशिष शेलारांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com